मुंबई : अटकेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डेंग्यूची लागण झाली आहे. भुजबळ यांना जे जे रुग्णालयातील MICU मध्ये दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले छगन भुजबळ यांच्या प्रकृती खालवली आहे. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याची माहीती समोर आली आहे. अद्याप नेमके कारण समोर आले नाही. मात्र, त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना थोड्याचवेळी अति अति दक्षता विभागात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, याआधीही भुजबळ यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी जे जे रुगणालयातील दोन डॉक्टर भुजबळ यांच्या तपासासाठी इडीच्या कार्यालयात पोहचले होते. आता पुन्हा भुजबळ यांना डेंग्यु झाल्याने ते आजारी आहेत.
महाराष्ट्र सदन आणि इतर ११ प्रकरणी घोटाळा केल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भुजबळांवर आरोपपत्र दाखल केले आहे. एकूण ८७० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांना कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून ते ईडीच्या कोठडीत आहेत.