मुंबई : मुंबई महानगर भागात आर्थिक क्षेत्रांचे विकेंद्रीकरण करण्यासाठी BKCसारखे आणखी पाच आर्थिक केंद्र सुरु केले जातील, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.
मुंबईत फिक्की कार्यक्रमात ते बोलत होते. कांजुरमार्ग, कळवा, भिवंडी अशा एकूण पाच भागात ही आर्थिक केंद्रे सुरु केली जाणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक केंद्रांचे विकेंद्रिकरण होण्यास मदत होणार आहे.
मुंबई आणि एकाच भागावर येणार ताणही त्यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे. नवीन आर्थिक केंद्र सुरु झाल्याने नवीन रोजगारही उपलब्ध होण्यास मदत होईल. मात्र, या व्यापारी संकुल यांचा कधी शुभारंभ होतो, याकडे लक्ष लागले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.