मुंबई: उच्च शिसणासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी आजही काही विशिष्ठ करिअरसाठी पालकांचा मुलांवर दबाव असतो. त्यासाठी पालक मुलं शाळेत असल्यापासूनच त्याच्या अभ्यासाच्या प्रगतीबाबत असुरसित असतात. याच भावनेतून मुलं चुकीचा मार्गतर निवडत नाहीत ना?
मुलाचा जन्म होण्याआधीच त्याचं करिअर पालक ठरवतात... आपण निवडलेल्या करिअरनुसार मुलाला कोचिंग क्लास लावले जातात. पण करिअरच्या तुलनेत मुलाची अभ्यासातली प्रगती फार चांगली नाही असं पालकांना वाटू लागतं.. आणि सुरुवात होते मुलाचा अभ्यासातला फोकस वाढवण्यासाठीचे प्रयत्न...
यासाठी पालक सायकॉलॉजिस्टकडे जातात. मुलांची अभ्यासातली एकाग्रता वाढवण्यासाठी औषध द्या, अशीही मागणी करतात. कोचिंग क्लासमध्ये भरभक्कम पैसा ओतूनही निकाल चांगला येत नाही, याचा अर्थ मुलामध्ये अटेंशन डेफिसिअन्सी आहे अशी तक्रार पालक करतात. पण प्रत्यक्षात मुलांना हा आजार नसतो.
या सगळ्यामध्ये मुलांवर प्रचंड दबाव येतो... आणि मुलं फोकस वाढवण्यासाठीची औषधं शोधतात.
कॉलेज आणि नोकऱ्यांमधल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आव्हानं पेलावीच लागतील. पण त्याची तयारी अगदीच लहानपणापासून करण्याची खरंच गरज नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.