पॉश मॉलमधल्या 'ब्रेड'मध्ये आढळली झुरळं

अन्नपदार्थांत अळ्या, झुरळं आढळल्याची धक्कादायक घटना पुन्हा एकदा मुंबईमध्ये उघडकीस आली. 

Updated: Apr 13, 2017, 08:52 PM IST
पॉश मॉलमधल्या 'ब्रेड'मध्ये आढळली झुरळं title=

मुंबई : अन्नपदार्थांत अळ्या, झुरळं आढळल्याची धक्कादायक घटना पुन्हा एकदा मुंबईमध्ये उघडकीस आली. 

मुंबईची रहिवासी असलेल्या पूजा दास या लोअर परेल भागात असलेल्या फिनिक्स मॉलमध्ये आपल्या चिमुरड्यासह गेल्या होत्या. या पॉश मॉलमध्ये असलेल्या 'फूडहॉल पलेडियम'मध्ये त्यांनी ब्रेड खरेदी केलं. 

तेव्हा त्या ब्रेडमध्ये त्यांना झुरळं आढळली. पूजा दास यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडे याची तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही...

आपला हा अनुभव पूजा यांनी फेसबुकवरून नेटिझन्सशी शेअर केलाय.