मुलाचा मृत्यू प्रकरण: सेंट जोसेफ शाळेविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

शाळेच्या इमारतीतून पडून एका विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी कळंबोलीतील सेंट जोसेफ शाळेविरोधात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कळंबोली पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Updated: Jul 22, 2015, 03:21 PM IST
मुलाचा मृत्यू प्रकरण: सेंट जोसेफ शाळेविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल title=

नवी मुंबई: शाळेच्या इमारतीतून पडून एका विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी कळंबोलीतील सेंट जोसेफ शाळेविरोधात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कळंबोली पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

शिक्षण खात्याच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आलीय. शाळेच्या सहाव्या मजल्यावरुन पडून विघ्नेश साळुंखे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. विघ्नेशचा वर्ग हा शाळेच्या पाचव्या मजल्यावर होता. परंतु तो आपल्या वर्गाकडे न जाता सहाव्या मजल्यावर गेला आणि तिथून पडून विघ्नेश हा जागीच ठार झाला होता.

या घटनेनंतर विघ्नेशच्या आईवडिलांनी शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. शिक्षण खात्याच्या अहवालानंतर सेंट जोसेफ शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.