www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीशी जागावाटपाच्या वादाऐवजी चर्चेतून मार्ग काढण्याची तयारी काँग्रेसनं दाखवली आहे. या संदर्भातसोमवारी काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक पार पडली.
या बैठकीत निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा झाली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसशी जागावाटपाबाबतही बैठकीत चाचपणी करण्यात आली. राष्ट्रवादीशी जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसनं नरमाईची भूमिका घेतलीय. जागांसाठी आग्रह न करता चर्चेतून मार्ग काढण्यासाठी काँग्रसची तयारी आहे.
काँग्रेसनं याआधी २६-२२ ऐवजी २९-१९ या नव्य़ा फॉर्मुल्याचा आग्रह धरला होता. मात्र आता निवडणूक समितीचा आग्रह न धरुन दोन्ही पक्षांनी चर्चेतून मार्ग काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.