मुंबईत कोळंबकर समर्थक शिवसैनिक भिडले

मुंबईत नायगावमध्ये कालिदास कोळंबकर समर्थक आणि शिवसैनिक एकमेकांना एका कार्यक्रमात भिडले होते. नायगावमध्ये बॉम्बे डाइंग भूखंडावर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे थीम गार्डन महापालिकेकडून उभारलं जाणार आहे. 

Updated: Feb 8, 2015, 11:23 PM IST
मुंबईत कोळंबकर समर्थक शिवसैनिक भिडले

मुंबई : मुंबईत नायगावमध्ये कालिदास कोळंबकर समर्थक आणि शिवसैनिक एकमेकांना एका कार्यक्रमात भिडले होते. नायगावमध्ये बॉम्बे डाइंग भूखंडावर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे थीम गार्डन महापालिकेकडून उभारलं जाणार आहे. 

या कार्यक्रमाचं भूमीपूजन रविवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं, या कार्यक्रमात कालिदास कोळंबकर बोलत असतांना, शिवसैनिकांनी आक्षेप घेतला, तेव्हा कोळंबकर समर्थक आणि शिवसैनिक आमने-सामने आले आणि एकमेकांना भिडले होते.

यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, महापौर स्नेहल आंबेकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, पालिका आयुक्त सिताराम कुंटे उपस्थित होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.