धुक्यात हरवली अवघी मुंबापुरी

मुंबईच्या आकाशात आज सकाळी प्रचंड मोठ्या प्रमाणात धुकं दिसून आलं, या धुक्यात अख्खी मुंबापुरी झाकोळल्यासारखी दिसत होती, ही स्थिती आणखी दोन दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 

Updated: Feb 8, 2015, 11:41 AM IST
धुक्यात हरवली अवघी मुंबापुरी title=

मुंबई : मुंबईच्या आकाशात आज सकाळी प्रचंड मोठ्या प्रमाणात धुकं दिसून आलं, या धुक्यात अख्खी मुंबापुरी झाकोळल्यासारखी दिसत होती, ही स्थिती आणखी दोन दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 

राजस्थानात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ही स्थिती तयार झाल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. 

मुंबई, पुणे आणि नाशिक दरम्यानही आज सकाळी मोठ्या प्रमाणात धुकं दिसून आलं आहे. या धुक्यात रेल्वे गाड्या तसेच रस्त्यावरील वाहनांना वाट काढणे कठीण झाले आहे.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.