मुंबई : दादरमध्ये वायफाय सुविधा देण्यावरुन वाद पेटला आहे. हा वाद शिवसेना-मनसे चिघळण्याची शक्यता असताना मुंबई महानगर पालिकेने मनसेची वायफाय यंत्रणाच काढून टाकण्यासाठी पावले उचललीत. त्यामुळे पालिका अधिकारी आणि मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात चांगलीच जुंपली.
शिवसेनेने आधी दादर शिवाजीपार्क येथे वायफाय सुविधा देण्याची घोषणा केली होती. मात्र, हा घोषणेचे पुढे काहीही झाले नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही सुविधा सुरु करण्यासाठी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेतला. मनसेनेने कामही सुरु केले. मात्र, मनसेनेने सुरु केलेल्या कामाला पालिकेने विरोध केलाय. वायफाय सुविधेच्या वायर पालिका अधिकाऱ्यांनी तोडल्या. त्यामुळे मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक झालेत. आम्ही ही यंत्रणा उभी करणारच, असा पवित्रा मनसेनेने घेतलाय. दरम्यान, पालिकेची परवानगी न घेता 'वायफाय' यंत्रणा उभारण्याचे काम सुरु करणे हे बेकायदा आहे, अशी प्रतिक्रिया महापौर सुनील प्रभू यांनी केली. या यंत्रणेचे श्रेय लाटण्यासाठी हे सर्व चालले आहे, असे ते म्हणालेत.
आम्ही दिलेले आश्वासन पाळू असा पवित्रा आता शिवसेनेने घेतला आहे. मात्र, आम्ही आता काम सुरु केले आहे. त्यामुळे ही यंत्रणा जनतेसाठी सुरु करणार, असा ठाम विश्वास महापालिकेतील मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.