मुंबई: क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून दारुड्या पतीनं आपली पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीला पेटविल्याची धक्कादायक घटना वांद्रे खेरवाडी या ठिकाणी घडली. या घटनेत दोघी ८० ते १०० टक्के भाजल्या असून त्यांना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शिवणकाम करणारा हा दारुडा खेरवाडीमध्ये राहतो. त्याला दीड वर्षाची मुलगी आहे. बुधवारी रात्री पती दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याच्यासोबत भांडण झालं. यावेळी दीड वर्षाची चिमुरडी दूध पीत होती. पत्नी भांडत असल्यानं दारूच्या नशेत असलेला पती संतापला आणि त्यानं पत्नी आणि मुलीवर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिलं.
आरडाओरड ऐकून नागरिक जमा झाले आणि त्यांनी दोघींना भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याचं खेरवाडी पोलिसांनी म्हटलं असून दारुड्या पतीला अटक केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.