मुंबई : मुसळधार पावसामुळे काल अचानक ब्रेक लागलेली मुंबई आज पुन्हा रुळावर यायला सज्ज झालीय. सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर, ट्रान्स हार्बर या मार्गावर लोकल सेवा सुरु झाली. सकाळी आपल्या वेळापत्रकानुसार सीएसटीवरुन पहिली लोकल सोडण्यात आलीय. त्यामुळे मुंबईकरांची सुरुवात ऑन टाईम झालीय.
एका रात्रीच्या पावसाने मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल रेल्वे, रस्ते, वाहतूक सर्वच यंत्रणा कोलमडून पडली. बीएमसीचे दावे फोल ठरवत पावसानं चांगलाच आरसा दाखवला मात्र आता ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचाही निचरा झालाय. त्यामुळे मुंबापुरी आता पूर्वपदावर येत आहे.
मुंबईत भांडूप, विक्रोळी, कुर्ला, सायन, चुनाभट्टी, माटुंगा, दादर, लालबाग, हिंदमाता, परळ, एलफिस्टन, मज्जिद, अंधेरी आदी ठिकाणी पाणी तुंबल्याने रेल्वे सेवेबरोबरच रस्ते वाहतुकीही ठप्प पडली. त्यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल झालेत. तसेच देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा पूर्ण व्यवहार बंद होते. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.