दिवस महत्त्वाचा- कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदे अनुपस्थित

महापालिका निवडणूकीच्या निकालानंतरच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित आहेत. कल्याण-डोंबिवलीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढं आलाय. 

Updated: Nov 3, 2015, 01:39 PM IST
दिवस महत्त्वाचा- कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदे अनुपस्थित  title=

मुंबई: महापालिका निवडणूकीच्या निकालानंतरच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित आहेत. कल्याण-डोंबिवलीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढं आलाय. या निवडणूकीची धुरा एकनाथ शिंदेवर होती. त्यातच प्रचारादरम्यान शिंदेंनी राजीनामाही दिला होता. त्या पार्श्वभूमीवर शिंदेची गैरहजेरी महत्वाची ठरतेय.

- सुभाष देसाई, दिवाकर रावते, दिपक सावंत, रामदास कदम हे शिवसेनेचे बैठकीला उपस्थित 
- कॅबिनेट पूर्वी सुभाष देसाई यांच्या दालनात शिवसेनामंत्र्यांची बैठक झाली
- भाजपचे चंद्रकांत पाटील पण बैठकीला अनुपस्थित
- कॅबिनेट झाली की लगेच भाजप कोर कमिटीची बैठक होणार आहे

आणखी वाचा - निकालानंतर शिवसेना-भाजपच्या तलवारी म्यान, 'सामाना'तून सामोपचाराची भूमिका

आजचा दिवस राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर निकालानंतर आज कॅबिनेट बैठक होतेय. शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते बैठकीला उपस्थित आहेत. पण तरीही एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती खटकतेय.

आणखी वाचा - शिवसेनेने गड राखला, पण भाजप वाढला

कडोंमपा निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याला नाटक म्हटलं होतं. त्यावर एकनाथ शिंदेंनीही चोख प्रत्युत्तर दिलं होतं. आता निकालानंतर दोन्ही पक्ष थोडे नरमलेले दिसत असले तरी पुढे काय हा प्रश्न उत्सुकता निर्माण करतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.