... तर आम्हालाही काँग्रेसची गरज पडणार नाही- आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसला शून्य करण्यासाठी काँग्रेसला कशा प्रकारची उपाययोजना करावी लागेल याचा आज पुण्यामध्ये राहुल गांधींनी आपल्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. राहुल गांधींच्या या कानमंत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 25, 2013, 06:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसला शून्य करण्यासाठी काँग्रेसला कशा प्रकारची उपाययोजना करावी लागेल याचा आज पुण्यामध्ये राहुल गांधींनी आपल्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. राहुल गांधींच्या या कानमंत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या काही योजना यशस्वीपणे राबवल्या गेल्या तर आम्हालाही काँग्रेसची गरज पडणार नाही. असं विधान आव्हाड यांनी केलं आहे.
राहुल गांधींच्या मते काही योजना यशस्वी झाल्या तर त्यांना राष्ट्रवादीची गरज पडणार नाही. “आमच्याही काही योजना यशस्वीपणे राबवल्या गेल्या तर आम्हालाही काँग्रेसची गरज पडणार नाही” असं आव्हाडांनी म्हटलं आहे. सध्याच्या परिस्थितीत सांप्रदायिक शक्ती वाढू नयेत, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसोबत तडजोड करत आहेत, असं जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलं आहे. जातीयवादी शक्तींपासून लांब राहाणं, त्यांना सत्तेपासून दूर ठेवणं यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र राहाणं ही काळाची गरज असल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
राष्ट्रवादीला काँग्रेसला शून्य करण्याची राहुल गांधींची मोहिम असल्याचा कानमंत्र त्यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांना दिला आहे. काय केलं, तर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसची गरज पडणार नाही, याचा कानमंत्र राहुल गांधींनी दिला आहे. राहुल गांधींच्या या भूमिकेवर कार्यकर्त्यांनी टाळ्याही वाजवल्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचं हे वक्तव्य अत्यंत महत्वपूर्ण आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.