www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मध्य रेल्वेच्या वाहतुकाचा पुन्हा एकदा बोजवारा उडाला. सकाळीच लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. लोकल ३० ते ४५ मिनिटे लेट असल्याने कार्यालयात जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. कल्याण, ठाणे, भांडूप, कुर्ला या स्थानंकावर प्रचंड गर्दी झाली होती.
अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान माल गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने याचा परिणाम मध्य रेल्वेच्या लोकलवर झाला. कर्जत ते कल्याण दरम्यानची सेवा पूर्णपणे कोलमडली. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ स्टेशनजवळ माल गाडीमध्ये बिघाड झाला आणि लोकसचे टाईमटेबल बिघडले. त्यामुळे अनेक प्रवाशांना ३० ते ४५ मिनिटे अनेक स्टेशनवर प्रतिक्षा करावी लागली.
तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सेवेवर परिणाम झाला. कुर्ला, ठाणे, डोंबिवली याठिकाणी प्रचंड पाहायला मिळाली. दरम्यान, मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना कितीवेळ गाड्या उशिरा आहेत, त्याची माहिती न मिळाल्याने प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.