फडणवीस सरकारने शेतकऱ्याची 'खाट टाकली'

(जयवंत पाटील, झी २४ तास) दुष्काळ आ वासून बसला आहे. मृग नक्षत्र संपलं तरी अजूनही महाराष्ट्रातील काही भागात पाऊस नाही, पाऊस आला नाही, याला सरकार निश्चितच जबाबदार नाही. 

Updated: Jun 27, 2016, 11:49 AM IST
फडणवीस सरकारने शेतकऱ्याची 'खाट टाकली' title=

मुंबई : (जयवंत पाटील, झी २४ तास) दुष्काळ आ वासून बसला आहे. मृग नक्षत्र संपलं तरी अजूनही महाराष्ट्रातील काही भागात पाऊस नाही, पाऊस आला नाही, याला सरकार निश्चितच जबाबदार नाही. 

दुष्काळाच्या निवारणासाठी काही मार्गदर्शक तत्वे आहेत, ज्यांची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे. मात्र सरकारने शेतकऱ्यांकडे वेळ मारून नेली, आणि साफ दुर्लक्ष केल्याचं चित्र राज्यात आहे.

पाऊस आला जमीन ओली झाली की शेतकऱ्यांला थांबून चालत नाही. मदत नसल्याने शेतकऱ्याला मात्र खाट टाकून कापसाच्या पिकासाठी सरी पाडण्याची वेळ आलीय. सरकार जलयुक्त शिवारात 'ओलंचिंब' भिजलंय, असं भासवत असलं तरी सत्य काही वेगळंच आहे.

कदाचित मुख्यमंत्र्यांना आतातरी तीव्रता जाणवेल...

शेतकरी म्हणतात, महाराष्ट्रात फडणवीस सरकार आलं, जगण्यासाठी येणारी मदत तर कमीच झाली पण मदत मिळणेही आता दुरापास्त झालंय. हे शेतकऱ्यांचं मत आहे, यावर सर्वे केला तरी हीच मतं समोर येतील.

खालील मेसेज हा व्हॉटस अॅपवर फिरतोय, पण शेतकरी आणि त्याच्या गावाबद्दलची माहिती ही देखील व्हॉटस अॅपवरीलच आहे. हा शेतकरी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक गावचा असल्याचं स्पष्ट झालंय.

व्हॉटस अॅवर व्हायरल होतोय हा मेसेज आणि फोटो....

ता.चाळीसगाव येथील असल्याचं व्हॉटस अॅप आणि फेसबुकवर काही युजर्सने शेअर केलं आहे. हा फोटो शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती मांडणारा आहे, म्हणून हा फोटो येथे शेअर करतोय, असं म्हटलंय...

व्हॉटस अॅप आणि फेसबुकवरील मेसेज असा आहे...

शेतकरी विठोबा मांडोळे हा दुसऱ्याची कसाने शेती करतो.जवळ बैलजोडी नाही.भाडयाने लावायला पैसे नाहीत. म्हणून त्याने एकरभर शेतात खाटीच्या सहाय्याने सर पाडून कापूस लागवड केली.

परिस्थिती वर मात करणाऱ्या या शेतकरीच्या हिम्मतीला हृदयस्पर्श सलाम माझा... परमेश्वराने खरच या माझ्या शेतकरी राज्याची ईच्छा पूर्ण करो हीच देवा चरणी प्रार्थणा ईडा पिडा जावो माझ्या बळीराजाचे राज्य येवो...