राज ठाकरेंवर गुन्हा; RPIकडून पुतळा दहन

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यक्तव्याच्या निषेधार्थ आरपीआयने मुंबईत वांद्रेच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांकडून राज यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आले. त्याचवेळी राजविरोधात एट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 22, 2012, 01:43 PM IST

www.24taas.com,मुंबई
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यक्तव्याच्या निषेधार्थ आरपीआयने मुंबईत वांद्रेच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांकडून राज यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आले. त्याचवेळी राजविरोधात एट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज ठाकरेंविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.
भाषणात राज ठाकरेंनी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्याबाबत आक्षेपाहार्य़ शब्द वापरले होते. याबाबत समाजवादी पार्टीच्या विद्यार्थी सेलच्या मुंबई अध्यक्षांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरुन कलम ५०४ अन्वये गुन्हा दाखल करुन घेण्यात आलाय.
राज ठाकरेंनी आरपीआय नेत्यांवर केलेल्या टीकेचे आज पडसाद उमटलेत. राज ठाकरेंनी आरपीआय नेते आणि इंदू मिलबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत आरपीआय कार्यकर्त्यांनी वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी राज यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आरपीआय कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा पुतळा जाळला.
राज य़ांनी आझाद मैदानावरच्या सभेत भगवान बुद्धांच्या मुर्तींची विटंबना होत असताना आरपीआय नेते इंदू मिलचा मुद्दा समोर करीत बसलेत असा टोला राज यांनी लगावला होता. राज यांची हीच टीका आरपीआय नेत्यांच्या जिव्हारी लागलीये. राज यांच्य़ा वक्तव्याचे पडसाद उमटू लागलेत.
मनसेचे रॅली आयोजक शिरिष सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. विना परवानगी मोर्चा काढल्याबाबत त्यांच्यावर डी.बी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज यांच्यावर कारवाई करण्याचे पोलिसांनी संकेत दिले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.