मुंबईतील गोवंडीत भीषण आग, गौतमनगरमधील झोपड्या खाक

गोवंडी परिसरातील गौतमनगरमधील एका झोपडपट्टीला पहाटे भीषण आग लागली. या आगीत अनेक झोपडपट्ट्या जळून खाक झाल्यात. आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहे.

Updated: May 6, 2016, 08:06 AM IST
मुंबईतील गोवंडीत भीषण आग, गौतमनगरमधील झोपड्या खाक title=

मुंबई : गोवंडी परिसरातील गौतमनगरमधील एका झोपडपट्टीला पहाटे भीषण आग लागली. या आगीत अनेक झोपडपट्ट्या जळून खाक झाल्यात. आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहे.

या भीषण आगीचे नेमके कारण समजु शकलेले नाही. मात्र, सिलिंडर स्फोटामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १४ गाड्या तसेच ८ पाण्याचे टँकर आणि २ रुग्णवाहीका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीवर जोरदार पाण्याचा फवारा मारण्यात येत आहे. या आगीत अग्निशमन दलाचा एक जवान जखमी वृत्त आहे. दरम्यान, सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मोठे नुसकसान झालेय.