परळमध्ये एमटीएनल गोदामाला भीषण आग

शहरातील परळ येथील माऊली सदन परिसरात एमटीएनल गोदामाला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच १४ अग्निशमन गाड्या रवाना झाल्यात. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते.

Updated: Dec 29, 2015, 11:29 PM IST
परळमध्ये एमटीएनल गोदामाला भीषण आग title=
संग्रहीत

मुंबई : शहरातील परळ येथील माऊली सदन परिसरात एमटीएनल गोदामाला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच १४ अग्निशमन गाड्या रवाना झाल्यात. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते.

एमटीएनल गोदामाजवळ असणाऱ्या मोबाईल टॉवरच्या जनरेटरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली. आगीने भीषण स्वरूप धारण केले होते. गेल्या दोन तासांपासून अग्निशमन दलाकडून ही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

दरम्यान, अग्निशमन दलाला या आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.  आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.