मुंबई : ओशिवरा येथील घास कंपाऊंडला लागलेल्या भीषण आगीत पाचशेहून अधिक फर्निचर वर्कशॉप, गँरेज,छोटी दुकाने जळून खाक झाली.
साडेबारा वाजता लागलेली आग आटोक्यात आणण्यास मुंबई अग्निशमन दलास चार तासांहून अधिक कालावधी लागला. १२ फायर इंजिन, १६ वॉटर टँकरच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली.
सर्व परिसरात दाटीवाटीने वर्कशॉप उभी केलेली असल्याने आग विझविण्यात अग्निशमन दलाला मर्यादा आल्या.तसंच फर्निचर तयार करणारे अनेक छोट्या कारखान्यात लाकडी साहित्य सर्वत्र असल्यानं आग पसरण्यास मदत झाली.
तसंच काही ठिकाणी गँस बॉयलरचे स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला. या आगीमुळं मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.
Major fire at furniture market in mumbai #6cylinderblast @ZeeNews @zee24taasnews @RidlrMUM @Mumbaikhabar9 pic.twitter.com/iEuAyDfjEh
— Kavita sharma (@thekavitasharma) November 25, 2016
#majorfire #furnituremarket #jogeshwari pic.twitter.com/qQJJ4wFqD7
— Kavita sharma (@thekavitasharma) November 25, 2016