जळगावानंतर मुंबईतही आढळला 'उडणारा साप'

मुंबईत नुकताच एक नवीन पाहुणा दिसलाय... हा त्याचा मुंबईतला पहिलाच मुक्काम बरं का... त्याला आतापर्यंत मुंबईत कुणीच पाहिलेलं नव्हतं... आम्ही बोलतोय 'ब्रॉन्झ बॅक' या पाहुण्याबद्दल... सोप्या भाषेत सांगायचं तर उडणाऱ्या सापाबद्दल...

Updated: Feb 5, 2015, 01:52 PM IST
जळगावानंतर मुंबईतही आढळला 'उडणारा साप' title=

मुंबई : मुंबईत नुकताच एक नवीन पाहुणा दिसलाय... हा त्याचा मुंबईतला पहिलाच मुक्काम बरं का... त्याला आतापर्यंत मुंबईत कुणीच पाहिलेलं नव्हतं... आम्ही बोलतोय 'ब्रॉन्झ बॅक' या पाहुण्याबद्दल... सोप्या भाषेत सांगायचं तर उडणाऱ्या सापाबद्दल...

अर्थातच, या 'फ्लाईंग स्नेक'ला पंख नसतात... पण तो एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर उडी मारतो... मुंबईत त्यानं पहिल्यांदाच दर्शन दिलंय... त्याच्या पाहुणचाराचा मान मिळाला तो पोलीस अधिकारी विनोद माळवे यांना....

या सापानं एन्ट्री घेतली ती थेट पोलीस अधिकाऱ्याच्या घरी... विनोद माळवे हे माहीम पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या पोलीस वसाहतीत राहतात... संध्याकाळी सहा वाजता त्यांना त्यांच्या किचनमध्ये आलेल्या पाहुण्याची चाहूल लागली.... 

या सापाला 'ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक' असं म्हणतात... त्याचं आपल्याकडचं नाव रुखई... त्याचं आयुष्य अवघ्या दीड वर्षाचं... माळवेंकडे सापडलेला हा साप नर जातीचा आहे. एखाद्या सापाला पाहताच एखाद्याची भीतीनं पाचावर धारण बसेल... पण माळवेंना याची सवय आहे... कारण त्यांच्याकडे आधीही सापांनी मुक्काम केलाय. 

माळवेंच्या घरी हा साप दिसताच त्यांनी माहीम पोलीस स्टेशनला कळवलं. माहीम पोलिसांनी शिवाजी पार्क पोलिसांना बातमी दिली. शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये  तयार असलेली सर्पमित्रांची टीम ताबडतोब माहीमला घटनास्थळी पोहोचली आणि त्या सापाला ताब्यात घेतलं.
 
ब्रॉ़न्झ बॅक हा अतिशय दुर्मिळ साप समजला जातो... तो पूर्णपणे बिनविषारी आहे. तो झाडावरच राहतो... मुंबईकरांना तरी त्याचं प्रत्यक्षात दर्शन पहिल्यांदाच घडलंय. आता हा पाहुणा कुठून आला... आणि येताना एकटाच आलाय की आणखी कुणा मित्रांनाही घेऊन गेलाय, याची चौकशी सुरू झालीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.