मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाबर यांच्या पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
शिवसेनेने लोकसभेला तिकीट नाकारल्यापासून बाबर सेना पक्ष नेतृत्वावर नाराज होते. लोकसभेच्या निवडणूकच्यावेळीच त्यांनी शिवसेना पक्ष सोडला होता. त्याचवेळी शिवसेना सोडताना गजानन बाबर यांनी उद्धव ठाकरेंनी तिकीटासाठी पैसे मागितल्याचा आरोपही केला होता. तेव्हापासून त्यांची दखल शिवसेनेने घेतलेली नव्हती.
गजानन बाबर यांनी पिंपरी-चिंचवड येथे शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली होती. २००९ साली शिवसेनेच्या तिकीटावर ते खासदार देखील झाले, यानंतर त्यांनी २०१४ मध्ये शिवसेनेचं तिकिट न मिळाल्याने शिवसेना सोडली होती. शिवसेनाविरोधात लक्ष्मण जगताप यांना त्यांनी पाठिंबा दिला होता.