चहाच्या टपरीवरही फ्री 'वाय-फाय'!

चहाच्या टपरीवर चहा पिता पिता आपल्या फ्री इंटरेनटचा वापर करता आला तर... होय, ही कल्पनाही आता प्रत्यक्षात आलीय.

Updated: Feb 3, 2015, 05:04 PM IST
चहाच्या टपरीवरही फ्री 'वाय-फाय'! title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : चहाच्या टपरीवर चहा पिता पिता आपल्या फ्री इंटरेनटचा वापर करता आला तर... होय, ही कल्पनाही आता प्रत्यक्षात आलीय.

चहाचा घोट घेता घेता फोर्टमधील एका चहाच्या दुकानात वाय-फायचा आनंद सध्या मुंबईकर घेतायत. ‘मुफ्त इंटरनेट’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून 2016 पर्य़ंत भारतात वाय-फायच्यासह मोफत इंटरनेट देण्याची योजना अंमलात आणली गेलीय.  

याच संस्थेशी जोडले गेलेले चहा सेंटर याच वाय-फाय सेवेनं लोकांना आकर्षित करण्याचं काम करतायत. भारतात अजून 85 टक्के नागरिक इंटरनेटचा वापर करत नाहीत. 1.3 अरब लोकसंख्या असलेल्या भारतातील अजून 1 अरब जनतेनं कधीच वापर केलेला नाही. त्यामुळेच आता मोफत वाय-फाय सेवेमुळे लोकं इंटरनेट फ्रेंडली आणि मोफत इंटरनेटचा वापर करु शकतील. 

‘मुफ्त इंटरनेट’द्वारे नोंदणी शुल्क किंवा डेटा फीशिवाय फुकटात इंटरनेट सेवा उपलब्ध होईल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी फक्त मुफ्त वाय-फाय अकाऊंट क्रिएट करायचे आहे. ते झाल्यानंतर तुम्ही कुठेही, कधीही फुकटात इंटरनेट वापरू शकाल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.