मुंबई पुन्हा हादरली, २० वर्षीय तरुणीवर गँगरेप

मुंबई पुन्हा एकदा गँगरेपच्या घटनेनं हादरलीय. घाटकोपरच्या एका २० वर्षीय तरुणीवर अज्ञात नराधमांनी सामूहिक बलात्कार केलाय. वांद्रे टर्मिनसवरून रिक्षानं घाटकोपरकडे निघालेल्या तरुणीवर हा प्रसंग ओढवला. नालासोपाऱ्यात तिच्यावर गँगरेप झाला.

Updated: Sep 13, 2015, 04:12 PM IST
मुंबई पुन्हा हादरली, २० वर्षीय तरुणीवर गँगरेप  title=

नालासोपारा: मुंबई पुन्हा एकदा गँगरेपच्या घटनेनं हादरलीय. घाटकोपरच्या एका २० वर्षीय तरुणीवर अज्ञात नराधमांनी सामूहिक बलात्कार केलाय. वांद्रे टर्मिनसवरून रिक्षानं घाटकोपरकडे निघालेल्या तरुणीवर हा प्रसंग ओढवला. नालासोपाऱ्यात तिच्यावर गँगरेप झाला.

अधिक वाचा - २५ वर्षीय विवाहितेवर भोंदूबाबाचा बलात्कार

९ सप्टेंबरला घाटकोपर इथं राहणारी तरुणी सुरतवरुन वांद्रे टर्मिनसला आली होती. यानंतर घाटकोपरला जाण्यासाठी तिनं रिक्षा पकडली. मात्र रिक्षाचालकानं रिक्षा घाटकोपरच्या दिशेनं न नेता नालासोपाराच्या दिशेनं नेली. यानंतर अज्ञात नराधमांनी रिक्षाचा पाठलाग सुरु केला. काही वेळानं त्यांनी रिक्षाचालकाला रिक्षातून हिसकावून लावलं आणि तरुणीला नालासोपारा इथं नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

अधिक वाचा - बदनापूरमध्ये संताप, बलात्कारानंतर अल्पवीयन सहा महिन्याची प्रेग्नंट

दरम्यान, निर्मलनगर पोलीस स्टेशनमध्ये पीडित तरुणीनं तक्रार दाखल केली आहे. पोलीस त्या नराधमांचा शोध घेत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.