मुंबईतल्या पेव्हर ब्लॉकनं घेतला तरुणीचा जीव

मुंबईत रस्त्यावरील पेव्हर ब्लॉकने एका तरुणीचा जीव घेतला आहे. जोगेश्वरीमध्ये पेव्हरब्लॉकमुळे दुचाकीचा टायर स्लीप होऊन या तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुणी जखमी झाली आहे. 

Updated: Feb 4, 2017, 09:09 PM IST
मुंबईतल्या पेव्हर ब्लॉकनं घेतला तरुणीचा जीव

मुंबई : मुंबईत रस्त्यावरील पेव्हर ब्लॉकने एका तरुणीचा जीव घेतला आहे. जोगेश्वरीमध्ये पेव्हरब्लॉकमुळे दुचाकीचा टायर स्लीप होऊन या तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुणी जखमी झाली आहे.

इशा नीलेश गोटे असं मृत तरुणीचं नाव असून ती अक्षता मालाडकर हीच्यासोबत दुचाकीनं चालली होती. गाडीचा टायर स्लीप झाल्यानं इशा शेजारच्या बसच्या टायरखाली सापडली. त्यात तीचा जागीच मृत्यू झाला, तर अक्षता मालाडकर ही तरुणी बेशुद्ध झाली.

अक्षताला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील प्रतापनगर बसस्टॉपजवळच्या धुर्व मोटार्स समोर हा अपघात झाला.