'पोलिसांना ऑटोमॅटिक हत्यारं द्या'

हल्ली गुन्हेगारांकडे एके-47सारखी हत्यारं असतात. या गुन्हेगारांना संपवण्यासाठी पोलिसांना रिव्हॉल्वरऐवजी ऑटोमॅटिक हत्यारं द्या, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. 

Updated: Mar 10, 2017, 10:41 PM IST
'पोलिसांना ऑटोमॅटिक हत्यारं द्या' title=

मुंबई : हल्ली गुन्हेगारांकडे एके-47सारखी हत्यारं असतात. या गुन्हेगारांना संपवण्यासाठी पोलिसांना रिव्हॉल्वरऐवजी ऑटोमॅटिक हत्यारं द्या, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे.

एका जनहीत याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे मत मांडलं आहे. याचबरोबर न्यायालयानं पोलिसांच्या पदोन्नतीबाबतही भाष्य केलं आहे. दर १२ वर्षांनी पोलिसांना पदोन्नती द्यायला पाहिजे. पोलिसांच्या कामाचे तास आणि त्यांच्यावरचा ताण कमी करावा, असं न्यायालयानं सांगितलं आहे.