www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोने दरात घसरण सुरुच आहे. ऑगस्टपर्यंत सोने प्रतितोळा 25,800 रुपयांपेक्षा खाली येण्याची शक्यता आहे.
जूनमध्ये सोने बाजारात मंदी दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात घसरण दिसून आली. 1250 डॉलरपेक्षा खाली ही घसरण दिसून आलेय. गेल्या सात महिन्यात झालेली ही घसरण मोठी होती.
भारत आणि चीनबरोबर जगभरात सोन्याची मागणीत घट झाल्याचे दिसून येत आहे. तसेच सोन्याच्या नाण्याचीही मागणी घटलेली दिसत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची मजबूतीही सोने दर घटण्यास कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.
रुपयाचा प्रभाव डॉलरवर झाल्याने याचा परिणाम सोने बाजारावर झाला. सोने अभ्यासक आणि बाजार तज्ज्ञ राजीव कपून यांनी सांगितले की, सोने बाजारात घरसण आणि दरवाढीचे संकेत दिसून येत आहे. गुंतवणुकदार सोने खरेदी करु शकतात. सोने दरात ऑगस्त महिन्यात थोडी वाढ दिसून येईल. 26950 ते 27150 दर असू शकेल. तर 26840 पर्यंत खाली जाण्याचे संकेत आहेत. सोने दराबरोबरच चांदीवर बाजाराचा परिणाम दिसून येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.