हार्बर मार्गावर आजपासून १२ डब्यांची लोकल सेवा सुरु

हार्बर मार्गावरील लोकलचा प्रवास आता अधिक सुकर होणार आहे. आजपासून हार्बरवर १२ डब्यांच्या लोकल सुरु झाल्या आहेत. 

Updated: Aug 10, 2016, 05:34 PM IST
 हार्बर मार्गावर आजपासून १२ डब्यांची लोकल सेवा सुरु title=

मुंबई : हार्बर मार्गावरील लोकलचा प्रवास आता अधिक सुकर होणार आहे. आजपासून हार्बरवर १२ डब्यांच्या लोकल सुरु झाल्या आहेत. आतापर्यंत प्रायोगिक तत्वावर काही गाड्याच १२ डब्यांच्या चालविण्यात येत होत्या.

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर आजपासून  सर्व गाड्या १२ डब्यांच्या चालविण्यात येत आहे. त्यामुळे अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे लोकलमधील प्रवास अधिक सुकर होणार आहे.