www.24taas.com, मुंबई
मुंबईत २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जीवंत आरोपी अजमल आमिर कसाब याला आज सकाळी पुण्यातील येरवडा कारागृहात फासावर चढवलं गेलं. यावरच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी समाधान व्यक्त केलंय. कसालाला फाशी देऊन दहशतवाद्यांना कडक संदेश दिला गेल्याचं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय. सरकारच्या वतीनं निकम यांनी २६/११चा खटला कसाबच्या विरुद्ध लढला होता.
‘मुंबई हल्ल्यातील दोषी कसाबला फासावर दिल्यानं आपल्याला आनंदच झालाय... यालाही दोन कारणं आहेत... पहिलं म्हणजे मुंबई हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळालाय आणि दुसरा म्हणजे आपण दहशतवाद्यांना या माध्यमातून कठोर संदेशही दिलाय’ अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलीय. मुंबईवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात १६६ जण मृत्यूमुखी पडले होते.
मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ मध्ये दहशतवादी करण्यात आला होता. कसाबने दयेचा अर्ज केला होता. मात्र, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कसाबचा दयेचा अर्ज मंगळवारी फेटाळला होता. आज सकाळी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कसाबला येरवडा कारागृहात सकाळी साडेसात वाजता फाशी देण्यात आल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे, मुंबईवरील या हल्ल्याला चार वर्षांचा कालावधी या २६ नोव्हेंबरला पूर्ण होणार होते. त्यापूर्वीच कसाबला फासावर लटविण्यात आले आहे.