मुंबई : परतीच्या पावसामुळे मुंबईकरांची संध्याकाळी घरी परतताना दमछाक झाली. दिवसभरात घामाच्या धारांनी भिजलेल्या मुंबईकरांना पावसानेही ओले चिंब केले, वातावरणात गारवा निर्माण झाला असला. तरी आज अचानक आणखी तापमानात वाढ झाली, तर मुंबईकरांना तब्बेत सांभाळावी लागणार आहे.
वादळी वाऱ्यातही रेल्वे घुसमटली!
मंगळवारी दुपारी डोंबिवली स्थानकात लोकलचा डबा घसरला होता, यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्याआधीच, वादळी वाऱ्यामुळे करीरोडजवळ पत्राउडून पेंटाग्राफवर पडला तर हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायरवर झाड कोसळल्याने, संपूर्ण हार्बरची सेवा ठप्प झाली. यामुळे घराकडे परतणाऱ्या मुंबईकरांचे हाल झाले.
झाडांची पडझड, वाहतुकीची वाट
वादळी पावसातील वाऱ्याचा जोर एवढा होता की, भाटिया रूग्णालयाजवळील बसस्टॉपजवळचं झाड संध्याकाळी कोसळलं, त्यात एक कार आणि मोटारसायकलीचा चुरा झाला. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते नरिमन पॉईंट हा भागात सात झाडं कोसळली आहेत.
प्रचाराचा धपराळाही धुवून टाकला
राजकीय कार्यकर्त्यांनी दिवसभर उन्हाचा तडाखा सोसत प्रचार केला आणि सायंकाळी पावसाने कार्यकर्त्यांना भिजवलं, आधीच प्रचारासाठी कमी दिवस राहिले असतांना, पावसाने प्रचार सभांना खोडा घातला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.