`मुंबई-पुणे एक्सप्रेस वे`वरची हॉटेल्स रात्री बंद

‘मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे’वरून तुम्ही रात्री प्रवास करत असाल तर सावधान... ‘एक्स्प्रेस वे’वरील सर्व हॉटेल्स रात्रीच्या वेळेत बंद करण्यात आलीत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 26, 2013, 08:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे’वरून तुम्ही रात्री प्रवास करत असाल तर सावधान... ‘एक्स्प्रेस वे’वरील सर्व हॉटेल्स रात्रीच्या वेळेत बंद करण्यात आलीत. एक्स्प्रेस वेवरील वाढत्या लुटमारीच्या घटनांमुळे पोलिसांनी हॉटेल्स रात्री बंद करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे दिवसा प्रवास करा अन्यथा पोटभर जेऊन निघा...
‘एक्स्प्रेस वे’वरील लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. फूड मॉल तर लुटमारी करणाऱ्या गुन्हेगारांचा अड्डा बनल्यासारखी परिस्थिती आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी मोठी लुटमार होतेय. या वाढत्या घटनांमुळे पोलिसांनी फूड मॉल परिसरात मध्यरात्री उशिरापर्यंत चालणारे सर्व हॉटेल्स बंद करण्याचे आदेश काढलेत. त्यामुळे रात्री अकरानंतर ‘एक्स्प्रेस वे’वरील सर्व हॉटेल्स बंद करण्यात येत आहेत. प्रवाशांनी मात्र पोलिसांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय.
रात्री हॉटेल्स बंद करण्याच्या निर्णयावर हॉटेल्स चालकही नाराज आहेत. हॉटेल्स बंद करण्याच्या निर्णयाबरोबर रात्रीच्या वेळी जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज निर्माण झालीय. अन्यथा आणखी गुन्हे वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.