'नोटबंदीनंतर तुमचा किती काळा पैसा बुडाला?'

महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. 

Updated: Feb 12, 2017, 08:43 PM IST
'नोटबंदीनंतर तुमचा किती काळा पैसा बुडाला?' title=

मुंबई : महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वारंवार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर तुमचा किती काळा पैसा बुडाला असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. नोटबंदीबरोबरच सर्जिकल स्ट्राईकवरूनही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. घरात राहून कोणीही शेर असतो. एकदा सर्जिकल स्ट्राईक करून दाखवा, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना म्हणाले.  

मताच्या लाचारीसाठी शिवसेनेनं काही ठिकाणी काँग्रसेबरोबर तर काही ठिकाणी राष्ट्रवादीबरोबर सेटिंग केली, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.