मुंबई : पैसा, प्रतिष्ठेचा जॉब, गडगंज बॅक बॅलन्ससाठी युवा वर्ग धडपडत असतो. मात्र काही जण हे सर्व मिळाल्यावरही भौतिक सुखांचा सहजपणे त्याग करतात, तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही.
हे उदाहरण घडलंय मुंबईतल्या जैन धर्मातल्या निशा कपाशीबाबत... न्यूयॉर्कमध्ये फॅशन डिझायनरसारख्या झगमगत्या क्षेत्रात ती निशा कार्यरत होती. १८ जानेवारीला निशानं दिक्षा घेतली... आणि अध्यात्मिक मार्गावर तिची पाऊलं पडत गेली.
आता तिची अत्यंत साधी राहणी आहे... माझ्या शरीराचा आनंद घेणं मी थांबवलं आणि आत्म्याचा आनंद मी शोधतेय, अशी प्रतिक्रीया निशानं दिलीय.
उल्लेखनीय म्हणजे, भारतात १४ हजार ५०० जैन साधू आहेत. त्यातील ७५ टक्के महिला आहेत. वय वर्षे १५ ते २७ दरम्यान दिक्षा घेतली जाते.
निशानंही फॅशन डिझायनरचं ग्लॅमरचं जग सोडून वयाच्या २७ व्या वर्षी दिक्षा घेत अध्यात्म मार्गाची निवड केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.