मुंबईकरांमधील माणुसकी संपतेय? जाणून घ्या काय घडतंय मायानगरीत

 बडे दिलवालों की नगरी म्हणजे मायानगरी मुंबई. मात्र अस्सल मुंबईकरांची ही खासियत आता पुसट होत चाललीय. आपल्या रक्तामांसाच्या नातलगांना बेवारस सोडण्याची वृत्ती मुंबईकरांमध्ये वाढत चाललीय का? 

Updated: Aug 13, 2015, 10:30 PM IST
मुंबईकरांमधील माणुसकी संपतेय? जाणून घ्या काय घडतंय मायानगरीत title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई:  बडे दिलवालों की नगरी म्हणजे मायानगरी मुंबई. मात्र अस्सल मुंबईकरांची ही खासियत आता पुसट होत चाललीय. आपल्या रक्तामांसाच्या नातलगांना बेवारस सोडण्याची वृत्ती मुंबईकरांमध्ये वाढत चाललीय का? 

मुंबई नगरी... लोकलमध्ये चौथी सीट असो, नाहीतर शेअर टॅक्सी... जे आहे, त्यातला थोडा घास दुसऱ्याला काढून देतो, तो मुंबईकर... पण याच मुंबईत आता माणुसकीचा अंश कमी होताना दिसतोय... हातपाय धड आहेत, तोपर्यंत मुंबईत कुणीही, कसाही पोटाची खळगी भरू शकतो. मात्र आजारपणामुळं किंवा वृद्धत्वामुळं माणूस बिनकामाचा ठरला की सुरू होतो त्याचा वनवास.... 

शिवडीतल्या टीबी हॉस्पिटलमध्ये अशा अनेक केसेस पहायला मिळतात. एखाद्याला इथं अॅडमिट केलं, की घरचे नातेवाईक त्याला पाहायलाही येत नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित रूग्णाचा मृत्यू झाला तरी अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घरी नेत नाहीत. बेवारस म्हणून त्या मृतदेहांची विल्हेवाट लावावी लागते. गेल्यावर्षी ११८ तर यंदाच्या वर्षी ५१ मृतदेह बेवारस ठरले.

केवळ टीबी हॉस्पिटलच नव्हे, तर बीएमसीच्या सायन, केईएम, नायर आणि सरकारच्या जेजे रूग्णालयातही अशा बऱ्याच केसेस दिसून येतात. अनेक नातेवाईक अशा रुग्णाला दाखल करताना खोटा पत्ता आणि फोन नंबर देतात. त्यामुळं नंतर औषधालाही नातेवाईक सापडत नाहीत.

नातेवाईकांनी असं वाऱ्यावर सोडून दिल्यानंतर, रुग्णालयातले कर्मचारीच त्यांचा आसरा ठरतात. योग्य उपचार करून त्यांना बरं करतात. पोलीस आणि सामाजिक संस्थांच्या मदतीनं त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.