किरीट सोमय्यांचे काँग्रेस-राष्ट्रवादीवर सनसनाटी आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा सिंचन घोटाळ्याबाबत राष्ट्रवादीच्या नेते आणि मंत्र्यांवर खळबळजनक आरोप केलेत. अजितदादा-रामराजे निंबाळकर आणि सुनील तटकरेंनी मिळून सिंचन घोटाळा केल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केलाय. सिंचन घोटाळा करून त्याचा पैसा राष्ट्रवादी काँग्रेसनं 2009 च्या निवडणुकीसाठी वापरलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 9, 2012, 05:52 PM IST

www.24taas.com, मुंबई
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा सिंचन घोटाळ्याबाबत राष्ट्रवादीच्या नेते आणि मंत्र्यांवर खळबळजनक आरोप केलेत. अजितदादा-रामराजे निंबाळकर आणि सुनील तटकरेंनी मिळून सिंचन घोटाळा केल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केलाय.
सिंचन घोटाळा करून त्याचा पैसा राष्ट्रवादी काँग्रेसनं 2009 च्या निवडणुकीसाठी वापरलाय. तसंच या घोटाळ्याची चौकशी होऊ नये यासाठी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये सेटिंग असल्याचाही आरोप सोमय्यांनी केलाय. घोटाळ्यांच्या चौकशीसाठी मंत्रालयात एसीबीच्या तब्बल 43 फाईल्स पडून आहेत. मात्र मुख्यमंत्री केवळ या घोटाळ्यांच्या चौकशीचं नाटक करत असल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केलंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनाही नवी मुंबईत 100 एकर जमीन आंदण म्हणून देण्यात आल्याचा सनसनाटी आरोप सोमय्यांनी केलाय.
सिंचन घोटाळ्यावरुन राज्यातलं वातावरण तापलेलं असतानाच भाजदप नेते किरीट सोमय्या यांनी आणखी एक आरोपांचा बॉम्ब टाकलाय. घोटाळ्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष जबाबदार असल्याचं सांगत सोमय्यांनी दोन्ही पक्षांवर शरसंधान केलय. अजित पवार, सुनील तटकरे आणि रामराजे निंबाळकर या तिघांनी मिळून जलसिंचन घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केलाय. या सिंचन घोटाळ्याचा पैसा 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी वापरण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. तसचं या प्रकरणाची चौकशी हो नये, यासाठी सरद पवार आणि सोनिया गांधींचे संगनमत झाल्याचंही सोमय्यांचं म्हणणं आहे. याप्रकरणी चौकशीचे केवळ नाटक मुख्यमंत्र्यांकडून सुरु असून, एसीबीच्या 43 फाईल्स मंत्रालयात पडून असल्याचं त्यांनी म्हटलंय.
रामराजे निंबाळकर, छगन भुजबळ आणि सुनील तटकरेंनाही त्यांनी लक्ष्य केलय. कृष्णा खोरे घोटाळ्याला रामराजे निंबाळकर जबाबदार असल्याचा आरोप करताना, यात छगन भुजबळांनाही फायदा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. नवी मुंबईत भुजबळांना 100 एकर जमीन मिळाल्याचंही त्यांचं म्हणणंय. तसचं तटकरेंच्या बेनामी कंपन्यांचा आणि कृष्णा खोरेचा ऑडिटर एकच असल्याचा आरोपही सोमय्यांनी केलाय. येत्या काळात राज्यातल्या मोठ्या बिल्डरांचा आणि राजकारणांच्या साटंलोट्यांचा पर्दाफाश करणार असल्याचंही सोमय्यांनी स्पष्ट केलय. एकूणच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्वच बड्या नेत्यांना सोमय्यांनी आरोपांच्या पिंज-यात ओढलं आहे.