महिला पोलीस प्रशिक्षणार्थीचा ससून रुग्णालयात मृत्यू

खंडाळा येथील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अविक्षा नरेश डोंगरे या प्रशिक्षणार्थीचा ससुन रुग्णालयात मृत्यू झालाय. 

Updated: Jan 24, 2015, 10:57 PM IST
महिला पोलीस प्रशिक्षणार्थीचा ससून रुग्णालयात मृत्यू  title=
फाईल फोटो

मुंबई : खंडाळा येथील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अविक्षा नरेश डोंगरे या प्रशिक्षणार्थीचा ससुन रुग्णालयात मृत्यू झालाय. 

अविक्षा ही मूळची भंडारा जिल्हातील होती. नोव्हेंबर महिन्यात गडचिरोली येथील पोलीस भरती दरम्यान तिची निवड झाली होती. अविक्षाला मणक्याचा त्रास होऊ लागल्याने प्रथम लोणावऴयातील काही खासगी रुग्णालयात आणि नंतर औंध येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारार्थ पाठविण्‍यात आले.

५ जानेवारी रोजी तिला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी तिला मणक्यातील टीबी झाल्याचे निदान झाले. तिच्यावर शस्त्रक्रियाही झाली. मात्र शनिवारी पहाटे अविक्षाचा मृत्यू झाला.

दरम्यान, प्रशिक्षण केंद्रातील अजून इतर दोन मुलीही रुग्णालयामध्ये अॅडमिट आहेत. पोलीस प्रशिक्षण केंद्रात ८०० प्रशिक्षणार्थी मुली आहेत. प्रशिक्षणा दरम्यानच्या अति शारीरीक ताणामुळेच अविक्षाच्या बाबतीत हा प्रकार घडल्याचा आरोप काहीजण करत आहेत. मात्र, खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रविंद्र सेनगावकर यांनी हे आरोप फेटाळून लावलेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.