एन्काऊंटर स्पेशालिस्ट आरोपींना राज ठाकरेंचाही पाठिंबा

मराठी पोलिसांवर अन्याय होता कामा नये. पोलिसांना योग्य न्याय मिळाला पाहिजे. माझी पूर्ण ताकद पोलिसांच्या मागे असेल. पोलिसांच्या पाठीमागे मराठी मंत्र्यांना उभे राहता येत नाही, आपलं दुर्दैव आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 21, 2013, 09:05 AM IST

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्याशिवाय एन्काऊंटर होतात का? ते सिस्टीमचे बळी आहेत, असा प्रश्न करीत मी प्रातंवादाचा मुद्दा मांडत नाही. मात्र, मराठी पोलिसांवर अन्याय होता कामा नये. पोलिसांना योग्य न्याय मिळाला पाहिजे. माझी पूर्ण ताकद पोलिसांच्या मागे असेल. पोलिसांच्या पाठीमागे मराठी मंत्र्यांना उभे राहता येत नाही, आपलं दुर्दैव आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली.
लखनभैया बनावट एन्काऊंटर केसप्रकरणी राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. आज पोलिसांच्या कुटुंबियांनी राज यांची भेट घेतली. या प्रकरणात फक्त मराठी पोलिसांनाच अडकवण्यात येत आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला आहे. अटक करणयात आलेल्यांपैकी काही पोलिसांच्या मुलींचं अजुन लग्न होत नाही? तर का, त्यांचे वडील जेलमध्ये आहेत म्हणून, असे राज म्हणालेत.
पोलीस हे सिस्टीमचे बळी ठरले आहेत. पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करण्यात येत आहे. मराठीच पोलिसांना अडकविले गेले आहे. राज्य सरकारने पोलिसांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. मनसे पोलिसांच्या पाठिशी आहे. तसेच मला या प्रकरणावर मला जास्त बोलायचं नाही, कारण आता हे प्रकरण हायकोर्टात जाणार आहे. हायकोर्टाकडून मला आणि महाराष्ट्राला अपेक्षा आहेत. ते सर्व निर्दोष सुटतील आणि पुन्हा कामावर रूजू होतील, अशी मला अपेक्षा आहे. दरम्यान, लखनभैया प्रकरणात १३ पोलिसांसह सूर्यवंशी यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आज सूर्यवंशी कुटुंबियांनी राज ठाकरेंची चर्चा केली. यावेळी कुटुंबियांनी त्यांच्याकडे मदतीची मागणी केली.

दरम्यान, डान्सप्रकरणी भाष्य करण्याचे राज यांनी टाळले. डान्सबार बंदीची सरकारची इच्छा नाही. आता निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे हे प्रकरण पुढे आलेय. त्यांना पैसा कमी पडत असेल, म्हणून हे प्रकरण पुढे आलेय, अशी मोजकीच प्रतिक्रिया राज यांनी यावेळी दिली.

काय आहे एन्काऊंटर प्रकरण?
लखनभैय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणी सर्वच्या सर्व म्हणजेच २१ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यात पोलीस अधिकारी प्रदीप सूर्यवंशीसह १३ पोलीसांचा समावेश आहे. या प्रकणातील प्रमुख आरोप असलेले प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा साथीदार असल्याच्या संशयावरून लखनभैया आणि त्याचा साथीदार अनिल भेडाला नोव्हेंबर २००६मध्ये तत्कालीन पोलीस इन्सपेक्टर प्रदीप शर्माच्या टीमनं वाशीमधून उचललं आणि वर्सोव्याच्या नाना-नानी पार्कजवळ त्याचं एन्काऊंटर केलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.