लालबागचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची पीएसआयला धक्काबुक्की

यंदाही लालबागचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी उघड

Updated: Sep 11, 2016, 04:41 PM IST

मुंबई : यंदाही लालबागचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी उघड झाली आहे. कार्यकर्त्यांची ही दादागिरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आपल्या ओळखीच्या व्यक्तींना रांगेशिवाय बाप्पाच्या दर्शनासाठी सोडणा-या मंडळाच्या कार्यर्त्यांना पोलीस उप-निरिक्षक सत्यवान पवार यांनी हटकलं. त्यावरुन या मुजोर कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली.

काल दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. लालबाग राजा मंडळाच्या कार्यकर्यांच्या मुजोरीची ही गेल्या सात दिवसांतली तिसरी घटना असल्याचं बोललं जातंय. काही दिवसांपूर्वी लालबागचा राजाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता. मात्र तो मंडळाचा कार्यकर्ता नसल्याचं सांगत लालबाग राजा मंडळानं हात झटकले होते.

शनिवारची ही घटना ही सीसीटीव्हीतच कैद झाली आहे. असं असूनही या प्रकरणी अद्याप मंडळाच्या कार्यकर्त्यांविरोधात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. आता या संदर्भात पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्व गणेशभक्तांचं लक्ष लागलेलं आहे. यापूर्वीही माध्यमांनी लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी उघकीस आणली होती.

पाहा व्हिडिओ