लिएंडर पेस आणि त्याच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी

भारताचा ख्यातनाम टेनिसपटू लिएंडर पेसला एका माजी क्रिकेटपटूनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पेसनं मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

Updated: Oct 17, 2014, 06:47 PM IST
लिएंडर पेस आणि त्याच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी   title=

मुंबई: भारताचा ख्यातनाम टेनिसपटू लिएंडर पेसला एका माजी क्रिकेटपटूनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पेसनं मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

लिएंडर पेस आणि त्याची लिव्ह इन पार्टनर रिहा पिल्लई यांच्यामध्ये वाद सुरु आहे. हे दोघं सध्या विभक्त झाले असले तरी या दोघांना आठ वर्षांची मुलगी आहे. तिच्यावरुन हा वाद सुरु आहे. सध्या  हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं आहे. १० ऑक्टोबर रोजी माजी क्रिकेटपटू अतुल शर्मानं पेसला कोर्टाच्या आवारातच धर्मकावल्याचं पेसनं त्याच्या तक्रारीत म्हटलं आहे.

अतुल शर्मा आणि रिहा पिल्लई हे दोघं सध्या रिलेशनशिपमध्ये असून याचे पुरावे कोर्टासमोर सादर करणार होतो. मात्र असं केल्यास मला आणि माझ्या आठ वर्षाच्या मुलीला याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील अशी धमकी अतुल शर्मानं दिल्याचं पेसनं नमूद केलंय. 

पोलिसांनी याप्रकरणी अतुल शर्माविरोधात गुन्हा दाखल केला असून चौकशीनंतरच अटकेची कारवाई केली जाईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.