मनसेचा एलआयसीला इशारा

मराठी मुलांसाठी नोकरी मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आंदोलन छेडलयं. एलआयसीनं येत्या १८ मे रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलाव्यात या मागणीसाठी मनसेनं मुंबईत हे आंदोलन केलं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 13, 2013, 02:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मराठी मुलांसाठी नोकरी मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आंदोलन छेडलयं. एलआयसीनं येत्या १८ मे रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलाव्यात या मागणीसाठी मनसेनं मुंबईत हे आंदोलन केलं.
मुंबईतल्या नरिमन पॉईंटच्या एलआयसीच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल. १८ मे रोजी एनटीसी आणि एलआयसीच्या भरती परीक्षा आहेत. या दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे.

एलआयसीनं परीक्षेची तारीख पुढं ढकलावी, अशी मागणी मनसेनं केलीये. एलआयसीनं ही मागणी मान्य न केल्यास परीक्षा उधळून लावण्याचा इशाराही मनसेनं दिलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.