मुंबई : उमेदवारी यादी जाहीर होऊ लागताच शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं समोर येतंय. प्रभाग क्रमांक 199 मधून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. किशोरी पेडणेकर यांचा आधीचा प्रभाग राखीव झाल्याने त्यांना या नव्या प्रभागातून उमेदवारी जाहीर झाली आहे.
मात्र याच प्रभागातून शाखाप्रमुख राजेश कुसळे यांच्या पत्नी इच्छुक होत्या. पेडणेकर यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी बुधवारी रात्री आशीष चेंबूरकर यांच्या ऑफिसबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती.