जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक धीम्यागतीने

जोरदार पावसामुळे आज धावत्या मुंबईचा वेग मंदावला. गुरुवारच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पावसानं धुमाकूळ घातलाय.

Updated: Aug 5, 2016, 02:20 PM IST
जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक धीम्यागतीने title=

मुंबई : जोरदार पावसामुळे आज धावत्या मुंबईचा वेग मंदावला. गुरुवारच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पावसानं धुमाकूळ घातलाय.

या जोरदार पावसामुळे लोकलच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालीये. मध्यरेल्वेची वाहतूख सकाळपासूनचं रखडत सुरु आहे.

माटुंगा ,सायन, कुर्ला स्टेशनदरम्यान रेल्वे ट्रॅक पाण्याने भरले असल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झालीये. जलद मार्गावरील वाहतूकही धीम्या गतीने सुरु आहे. ठाण्याहून सीएसटीकडे एकही लोकल जाणार नाही अशी उद्घोषणा ठाणे स्टेशनवर करण्यात आलीये. पुढील सूचना मिळेपर्यंत एकही लोकल जाणार नसल्याची सूचना देण्यात आलीये. 

तसेच पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला असून तेथील वाहतूक २०-२५ मिनिटे उशिराने सुरु आहे. हार्बरचीही तीच परिस्थिती आहे. अर्थात याचा परिणाम फक्त लोकलवर न पडता, लांबपल्ल्याच्या गाड्यांवरसुध्दा झालेला दिसतोय. पहाटेपासूनचं सुरु असलेल्या संततधार पावसामुळ मुंबईतल्या रस्ते वाहतुकीवरसुध्दा परिणाम पाहायला मिळतोय.