अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई: मुंबईतल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी अबू जिंदालच्या जीवाला धोका असल्याचं एनआयएनं सांगितलंय.
त्यामुळं अबूला दिल्लीला नेता येणार नसून त्याचा जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवण्यात यावा अशी विनंती एनआयएनं दिल्ली हायकोर्टाला केलीय.
यासंदर्भात अबू जिंदालच्या वकिलानं बाजू मांडावी असे आदेश दिल्ली हायकोर्टानं दिले आहेत. अबू जिंदाल सध्या मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.