मुंबई : विधानसभेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दादर येथील स्मारक बिल एकमताने मंजूर करण्यात आल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबतचे सुधारित विधेयक आज सांयकाळी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले.
राज्यमंत्री रणजित पाटील यांनी हे विधेयक सादर केले. या विधेयकाला भाजपसह मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला.
Maharashtra assembly unanimously passes a bill for Bal Thackeray Memorial in Dadar. pic.twitter.com/q2GxuFYHNl
— ANI (@ANI_news) March 7, 2017
स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा देण्याचा निर्णय नगरविकास विभागाने यापूर्वीच घेतला असून त्याबाबतची अधिसूचनाही काढली होती. महापौर बंगल्याची जागा पालिकेच्या मालकीची असल्यामुळे ती स्मारक समितीला हस्तांतरित करण्यासाठी सुधार समितीची आणि सभागृहाचीही मंजुरी मिळाली होती.
महापौर बंगल्याच्या ११,५५१.०१ चौरस मीटर जागेत बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.