मुख्यमंत्री निधीतील पैशाचा गैरवापर, डान्सवर केलेत खर्च

मुख्यमंत्री सहायता निधीचा पैसा जातो कोठे? याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीतून पुढे आलेय. मुख्यमंत्री सहायता निधीतील पैसे चक्क बॅंकॉक येथील डान्स कार्यक्रमावर उडविल्याचे पुढे आलेय.

Updated: Oct 24, 2015, 12:16 PM IST
मुख्यमंत्री निधीतील पैशाचा गैरवापर, डान्सवर केलेत खर्च title=

मुंबई : मुख्यमंत्री सहायता निधीचा पैसा जातो कोठे? याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीतून पुढे आलेय. मुख्यमंत्री सहायता निधीतील पैसे चक्क बॅंकॉक येथील डान्स कार्यक्रमावर उडविल्याचे पुढे आलेय.

अधिक वाचा : मुख्यमंत्री हे पाहा, दुष्काळासाठी नाना पाटेकरने काय केलं?

राज्यात एखादी आपत्तीजनक परिस्थिती ओढवली तर मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे मदत म्हणून केले जातात. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करण्याचे आवाहन राज्यशासनाकडून करण्यात येते. मात्र, मुख्यमंत्री सहायता निधीच्या पैशांचा जर गैरवापर होत असेल तर!

सध्या राज्यावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाचे हात तोकडे पडत आहेत. अशा वेळी समाजातील सर्व थरांतून पै-पै गोळा करून मुख्यमंत्री सहायता निधीकडे सुपूर्द केले जात आहेत. मात्र, या निधीवरच शासकीय अधिकाऱ्यांनी डल्ला मारलाय. या निधीचा वापर बॅंकॉक येथील नृत्यासाठी केला असल्याचे माहितीच्या अधिकारात धक्‍कादायक आणि गंभीर वास्तव उघड झालेय. 

अधिक वाचा : नाना, मकरंद अनासपुरे ग्रामीण जनतेचे खरेखुरे हिरो

या निधीचा आर्थिक मदतीसाठी योग्य वाटप होत नसून मुख्यमंत्री सहायता निधीतून बॅंकॉक येथील नृत्यासाठी ८ लाखांची नियमबाह्य खैरात १५ शासकीय कर्मचाऱ्यांनी केल्याची थक्क करणारी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना शासनाने उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्राच्या आधारे समोर आलेय.

विशेषबाब म्हणून सचिवालय जिमखान्याला ८ लाख मंजूर केले गेले आहे. त्या सचिवालय जिमखानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पदसिद्ध अध्यक्ष आहेत. दरम्यान, आठ लाखांचा निधी परत घेण्याची मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.