राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण आज जाहीर होण्याची शक्यता

महाराष्ट्र सरकार आज नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे.  

Updated: Sep 2, 2016, 09:16 AM IST
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण आज जाहीर होण्याची शक्यता title=

मुंबई : महाराष्ट्र सरकार आज नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत सर्व सामान्याला परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य सरकार विद्यमान गृह निर्माण कायद्यात मोठ्या प्रमाणात बदल करण्याची शक्यता आहे.

विद्यमान गृहनिर्माण कायद्यातील म्हाडाच्या पुनर्विकासाशी संबंधीत कायद्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ते बदलले जाण्याची शक्यता आहे.

50 वर्षांपेक्षा जुन्या इमारतींना जास्तीचा एफएसआय देवून खासगी विकासकामार्फत परवडणारी घरे बांधणार. बिल्डरांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्राच्या गृहनिर्माण कायद्यातील शिक्षा आणि दंडात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. 

मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासालाही गती मिळण्याची शक्यता आहे. BBD चाळीच्या पुनर्विकासासंदर्भातही काही ठोस निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.