अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ देणार नाही - रामदास आठवले

अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ देणार नाही अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी केली आहे. रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या काव्य शैलीनं पुन्हा एकदा यथेच्छ फटकेबाजी केली. निमित्त होतं रामदास आठवलेंना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रिपद मिळाल्याने करण्यात आलेल्या त्यांच्या सत्कार सोहळ्याचं.

Updated: Sep 2, 2016, 09:06 AM IST
अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ देणार नाही - रामदास आठवले title=

मुंबई : अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ देणार नाही अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी केली आहे. रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या काव्य शैलीनं पुन्हा एकदा यथेच्छ फटकेबाजी केली. निमित्त होतं रामदास आठवलेंना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रिपद मिळाल्याने करण्यात आलेल्या त्यांच्या सत्कार सोहळ्याचं.

षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या सत्कार सोहळ्यात आठवलेंनी उपस्थितांवर आपल्या कवितांची बरसात केली आणि सर्वांनाच पोट धरुन हसवलं. आपल्या खुमासदार शैलीत त्यांनी अनेक समस्यांवर भाष्य केलं.