मुंबई : भाजप राज्यमंत्रिमंडळाचा आज पहिला विस्तार होत आहे. या सरकारमध्ये शिवसेनेचे १० नेते आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचवेळी भाजपचे मित्रपक्ष निमंत्रण नसल्याने नाराज झालेत.
दरम्यान, विधानभवन परिसरात उभारण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्याच्या मंडपाची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. सुमारे अडीच हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. सायंकाळी ४ वाजता शपथविधी सोहळा होणार आहे.
तळ कोकणात शिवसेनेचं नेतृत्व करणाऱ्या दीपक केसरकरांवर राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शिवसेनेचे नेत रामदास कदम यांच्याकडे पर्यावरण, विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे एमएसआरडीसी, दीपक सावंत यांच्याकडे आरोग्य, सुभाष देसाईंना उद्योग, तर दिवाकर रावतेंकडे परिवहन खात्यांची जबाबदारी दिली जाणार असल्याचे सूत्रांकडून माहिती देण्यात आली.
तर भाजपचे आमदार गिरीश बापट यांची कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लागणार आहे. अनेक वर्षानंतर पुणे शहराला कँबिनेट मिळतंय; पुढच्या काळात शहरातील वाहतुकीसह विकासाचे पश्न मार्गी लावू असं बापट यांनी सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.