मुंबई : सत्ताकारण सुरु होत आता आठ महिने उलटले तरी सेना भाजपमधील धुसफूस कायम आहे. आता महामंडळ वाटपावरुन नव्याने सेना भाजपमध्ये राजकारणाचा आणखी रंग पाहायला मिळणार आहे.
शिवसेना-भाजपच्या महामंडळ जागावाटपाबाबतच्या आत्तापर्यंतच्या दोन बैठका झाल्या आहेत. यामध्ये भाजपाला ६० टक्के सेनेला ३० टक्के तर इतर घटक पक्षांना १० टक्के महामंडळ असं सर्वसाधारण सूत्र ठरलं असल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र सत्तेतील अल्प वाट्यानंतर महामंडळातही अल्प वाटा सेना सहन करण्याच्या मनस्थीतीत नाहीये.
सेनेला ४० टक्क्यांपेक्षा जास्त वाटा हवा आहे. खास करुन सिडको, म्हाडा, महिला आयोग अशा महत्त्वाच्या महामंडळ घेण्यावरुन जुंपणार असल्याची चिन्हे आहेत. यामुळे सेना भाजपमधील वादाला नव्या मुद्द्याने पुन्हा तोंड फुटणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.