मराठी प्राईम टाईमवरून राज ठाकरे - विनोद तावडेंमध्ये जुंपली

 मल्टिप्लेक्समधील मराठी सिनेमांच्या प्राईम टाईमवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांमध्ये जुंपली. दरम्यान, शो डे यांच्या ट्विटवरून शिवसेनेने जोरदार आक्षेप घेत आंदोलन केले. दही-मिसळही भेट दिली होती. त्यामुळे प्राईम टाईमवरून चांगलेच राजकारण तापले होते.

Updated: Apr 21, 2015, 07:23 PM IST
मराठी प्राईम टाईमवरून राज ठाकरे - विनोद तावडेंमध्ये जुंपली title=

मुंबई : मल्टिप्लेक्समधील मराठी सिनेमांच्या प्राईम टाईमवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांमध्ये जुंपली. दरम्यान, शो डे यांच्या ट्विटवरून शिवसेनेने जोरदार आक्षेप घेत आंदोलन केले. दही-मिसळही भेट दिली होती. त्यामुळे प्राईम टाईमवरून चांगलेच राजकारण तापले होते.

चित्रपटगृहात प्राईम टाईममध्ये मराठी सिनेमा बंधनकारक. मराठी चित्रपटांना सिनेमागृहात प्राईम टाईम संध्याकाळी सहा ते नऊची वेळ मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश काढला आहे. याबाबत घोषणा विनोद तावडे यांनी केली होती.

दरम्यान, क्रांती रेडकर हिनेही प्राईम टाईम मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. तिचा 'कांकण' हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यावेळी कणकवलीत प्राईम टाईम न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती. आता राज ठाकरेंनी विनोद तवाडे यांना चांगलाच चिमटा काढला. सरकारनं मल्टिप्लेक्स मालकांपुढं शेपूट घातल्याची टीका राज ठाकरेंनी केली. तर कुणाच्या आरवण्यानं मराठीचं भलं होत असेल तर आनंदच आहे, असा टोला  विनोद तावडेंनी लगावला.  

मराठी सिनेमा प्राईम टाईममध्ये मल्टीप्लेक्समध्ये लावण्यास काही बॉलिवूडच्या मंडळींनी विरोध केला आहे. यात अभिनेत्री ट्ववींकल खन्ना, अभिनेता ऋषी कपूर आणि लेखिका शोभा डे यांचा समावेश आहे.

मराठीमध्ये चांगले सिनेमे तयार होतात. मी मराठी आणि प्रादेशिक भाषांच्या सिनेमांचा आदर करतो. मात्र सिनेमा प्राईम टाईमला दाखवण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे की नाही हे मला माहीत नाही, असं मत आमिरने व्यक्त केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.