नशेत झिंगणालेल्या भिकारी महिलेकडं सापडलेलं ते बाळ कुणाचं?

मुंबईतल्या माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये सध्या नंदनवन फुललंय. एका दोन महिन्यांच्या गोंडस बाळाचा लळा संपूर्ण पोलीस ठाण्याला लागलाय. कसा तो पाहा... या बाळाला त्याच्या आईकडे पोहोचवण्यासाठी 'झी मीडिया'ने मोहीम उघडलीय. 

Updated: Aug 6, 2015, 11:58 AM IST
नशेत झिंगणालेल्या भिकारी महिलेकडं सापडलेलं ते बाळ कुणाचं? title=

मुंबई : मुंबईतल्या माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये सध्या नंदनवन फुललंय. एका दोन महिन्यांच्या गोंडस बाळाचा लळा संपूर्ण पोलीस ठाण्याला लागलाय. कसा तो पाहा... या बाळाला त्याच्या आईकडे पोहोचवण्यासाठी 'झी मीडिया'ने मोहीम उघडलीय. 

माटुंगा पोलीस ठाण्यातल्या छाया घारगे या महिला पोलीस सध्या या गोंडस आणि सुंदर अशा या बाळाची आईच झालीय. अगदी यशोदेप्रमाणे त्या बाळाची काळजी घेत आहेत. सोना, पिल्लू, बाबू असं नामकरणही त्यांनी या बाळाचं केलंय. पण हे बाळ त्याच्या आईपासून दुरावलंय. 

भाऊ दाजी रोडवर भीक मागणाऱ्या एका महिलेकडे हे बाळ पोलिसांना सापडलं. तिच्याकडे हे बाळ आलं कसं याचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक बाळासाहेब काकड यांनी दिलीय. 

सध्या हे बाळ सायन हॉ़स्पिटलमध्ये आहे. माटुंगा पोलीस ठाण्यातल्या महिला पोलीस आळीपाळीने या बाळाची चोवीस तास काळजी घेत आहेत.

या भीक मागणाऱ्या महिलेकडे हे बाळ सापडलं तेव्हा त्या महिलेने नशा केली होती. भर पावसात ही महिला बाळ घेऊन पावसात रस्त्याच्या कडेला लपून बसली होती. अशातच माटुंगा पोलिसांची या महिलेवर नजर गेली आणि त्यांनी बाळाला ताब्यात घेतलं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.